

High-Velocity Vehicular Deceleration: Severe Kinetic Impact Near Adul Phata Nodes
Sakal
आडूळ : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा (ता. पैठण) येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. १७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात पार्थ अर्जुन गिरी (वय १९, रा. खादगाव, ता. पैठण) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ गिरी हा दुचाकी (क्र. एमएच २० बीएम ५४३४) वरून पांढरी येथून आडूळकडे जात होता.