पूर्णा-हैदराबाद गाडीचे इंजिन फेल

भास्कर लांडे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

परभणी : पूर्णा ते हैदराबाद पॅसेंजर रेल्वेचे इंजिन गुरूवारी (ता.१४) आचानक फेल झाल्याने ही रेल्वे परभणी स्थानकावर तब्बल सव्वा तास थांबवून घेण्यात आली. नवीन इंजिन इंजिन जोडेपर्यंत प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.

परभणी : पूर्णा ते हैदराबाद पॅसेंजर रेल्वेचे इंजिन गुरूवारी (ता.१४) आचानक फेल झाल्याने ही रेल्वे परभणी स्थानकावर तब्बल सव्वा तास थांबवून घेण्यात आली. नवीन इंजिन इंजिन जोडेपर्यंत प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.

पूर्णा रेल्वेस्थानकातून सकाळी आठ वाजता ही रेल्वे परभणीत आली. येथून काही अंतरावर असतानाच रेल्वेच्या इंजिनमधून ऑईल गळण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे परभणी स्थानकात आल्यावर रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचा प्रयत्न केला. परंतू, त्यांना अपयश आले. म्हणून पर्यायी इंजिनची व्यवस्था करण्यात आली. परंतू, परभणीत अतिरीक्त इंजिन नव्हते. म्हणून नुकतीच परभणी स्थानकात आलेली परभणी ते नांदेड रेल्वेचे इंजिन काढून पूर्णेला जोडण्यात आले. ते काढून जोडेपर्यंत बराच वेळ गेला. तोपर्यंत आतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत पोहोचता आले नाही. ते `रेल्वे दुरूस्तीची वाट पाहत होते. बराच वेळ गेल्यानंतर रेल्वे निघत नसल्याने त्यांनी चौकशी केली. तेव्हा रेल्वेला वेळ लागणार असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना आचानक अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागला. शाळा सुरू झाल्याने बरेच शिक्षकही या रेल्वेत अडकले. त्याचा फटका हैदराबाद ते औरंगाबाद रेल्वेलाही बसला. कारण परभणी स्थानकातील तिन्ही प्लॅटफॉर्मवर रेल्वे होत्या.

काही वेळाने एक रेल्वे गेली तरीही परभणी-नांदेड रेल्वेचे इंजिन काढून हैदराबाद-औरंगाबाद रेल्वेला जोडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे परळीकडून आलेली हैदराबाद-औरंगाबाद रेल्वे परभणी स्थाकनापासून काही अंतरावर थांबवून घेण्यात आली. जोपर्यंत अन्य रेल्वे परभणीतून गेल्या, तोपर्यंत औरंगाबाद पॅसेंजर आऊटरला थांबविण्यात आली. त्यामुळे पूर्णा रेल्वेचा फटका हैदराबाद रेल्वेला देखील बसला. या गाडीतील प्रवाशांना देखील ताटकळत थांबावे लागले. शिवाय, परभणी-हैदराबाद गाडीतील प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागला.

नेहमीच अशा समस्या
 

दक्षिण मध्य रेल्वे विभागात प्रमुख्याने नांदेड विभागात सर्वाधिक अशा समस्या आहेत. रूळ तुटणे, रेल्वेचे इंजिन फेल होणे,
हॉर्न न वाजने किंवा सुरू झालेल हॉर्न बंद न होणे आदी समस्या वारंवार होत आहे. नुकतीच सेलू स्थानकावर एका एक्सप्रेस रेल्वेच्या इंजिनला आग लागली होती. जवळपास त्याला महिनाही लोटला. तोच पूर्णा-हैदराबाद रेल्वेचे इंजिन फेल झाले. हिवाळ्यात रेल्वेरूळ तुटण्याच्या घटना नेहमीच्याच असतात. उल्लेखणीय म्हणजे इंजिन बिघाड होण्याचे प्रमाण सर्वाधिक नांदेड विभागात आहे.

कोट
नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता परभणी स्थानकावर आलो. पूर्णा रेल्वे अधिच तीस मिनीटे उशिरा आली होती. त्यात रेल्वेचे इंजिन फेल झाल्याचे समजले. त्याआधी तिकीटही काढले होते. त्यामुळे अन्य वाहनाने जाता देखील येईना. या गोंधळात जवळपास दीड तास गेला.
- गजानन पाटील, प्रवाशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purna-Hyderabad train engine fails