esakal | पूर्णेचा बळिराजा साखर कारखाना साखर उताऱ्यात मराठवाड्यात क्रमांक एकवर

बोलून बातमी शोधा

file photo

राज्याचा साखर उतारा १०. ३९ आहे. मराठवाड्यात सर्वाधिक साखर उतारा पूर्णा येथील बळिराजा साखर कारखान्याचा ११. १८ ठरला आहे.

पूर्णेचा बळिराजा साखर कारखाना साखर उताऱ्यात मराठवाड्यात क्रमांक एकवर
sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा ( जिल्हा परभणी ) : राज्यात १५ मार्चअखेर साडेनऊ कोटी क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून नऊ कोटी पंचावन्न लक्ष मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्याचा साखर उतारा १०. ३९ आहे. मराठवाड्यात सर्वाधिक साखर उतारा पूर्णा येथील बळिराजा साखर कारखान्याचा ११. १८ ठरला आहे.

महाराष्ट्रात एकूण ९५ सहकारी तर ९३ खाजगी साखर कारखाने आहे. ४८ साखर कारखाने बंद आहेत. राज्यात या हंगामात नऊ कोटी ५५ लक्ष दोन हजार ४९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप ता. १५ मार्चअखेर झाले. त्यातून नऊ कोटी ४० लक्ष ४७ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. राज्याचा साखर उतारा १०. ३९ आहे. नांदेड विभागात दहा सहकारी व पंधरा खाजगी साखर कारखाने आहेत. एक कारखाना बंद आहे. नांदेड विभागात ८३ लक्ष ३७ हजार २७१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले व ८२ लक्ष ७९ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. त्याचा साखर उतारा ९. ९३ आहे. औरंगाबाद विभागात १२ सहकारी व दहा खाजगी असे २२ साखर कारखाने आहेत. ८० लक्ष ८५ हजार ६४५ मेट्रिक टन साखरेचे गाळप करण्यात आले.७६ लक्ष चार हजार ११५ क्विंटल साखर उत्पादित झाली. त्याचा साखर उतारा ९. ४० आहे.

ऊस लागवड कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे साखर उतारा चांगला

बळीराजा साखर कारखाना लि, कानडखेड ता. पुर्णा जि. परभणी या साखर कारखान्याने १३३ दिवसात पाच लक्ष ४७ हजार ३५० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन सहा लक्ष आठ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली. साखर उतारा ११. १८ आला आहे. जो मराठवाड्यात सर्वाधिक आहे. तसेच तीन कोटी २२ लक्ष एक हजार १०० युनिट विज निर्मिती करुन निर्यात केली आहे. अशी माहिती चेअरमन शिवाजी जाधव यांनी दिली. कारखान्यातील सर्व कर्मचारी, शेतकी विभाग, कामगार, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांचे हे श्रेय आहे. ऊस लागवड कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे साखर उतारा चांगला आला.
-शिवाजीराव जाधव, चेअरमन बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड ता.पूर्णा. 

संपादन- प्रल्हाद कांबळे