Hingoli Student Strike : ‘आम्हाला शिक्षक द्या’ सीईओंच्या दालनात पुसेगावच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

Hingoli latest News : शिक्षणाधिकारी यांनी एका शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करीत दुसरा एक शिक्षक पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
Hingoli Student Strike
Hingoli Student StrikeSakal
Updated on: 

Hingoli News : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत शिक्षकांच्या चार जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. रिक्त जागा तत्काळ भरण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालक, शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. एक) थेट सीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

शिक्षणाधिकारी यांनी एका शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करीत दुसरा एक शिक्षक पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे.

पहिली ते सातवीपर्यंत वर्गांत एकूण २२० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दहा शिक्षकांची पदे मंजूर आहेत; मात्र शाळेत सध्या केवळ चारच शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी एक शिक्षक तर नऊ वर्षांपासून आॅनलाइन काम करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

दरम्यान या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन देखील काही उपयोग झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिवसेना (उबाठा) शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चोतमल यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या दालनात शाळा भरवत ‘आम्हाला शिक्षक द्या’ म्हणत ठिय्या केला.

शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी पुसेगाव जिल्हा परिषद ऊर्दू येथे शिक्षकांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.

Hingoli Student Strike
Students Survey : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण';मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाऊल ,२० जुलैपर्यंत मोहीम

मात्र आम्हाला आताच शिक्षक द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्याने त्यानंतर शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी तातडीने एका शिक्षकांची नियुक्ती केली. तसेच एक शिक्षक पंधरा दिवसांत देणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी, पालक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दालन सोडले. यावेळी शिवसेनेचे प्रदेश संघटक देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल चौतमाल यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Teacher Award 2026 Sandeep Shinde Receives Pune District Honour After Transforming School And Guiding Students To Success
Karmala ZP School
Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation
Jadhav Guruji Transfer Sparks Protest In Malwadi Parents Threaten To Withdraw 77 Students From Zilla Parishad School
Marathi News Esakal
www.esakal.com