‘त्या’ रुग्णाच्या कुटुंबातील १४ जणासह ६४ जन क्वारंटाइन

SVD_0544.JPG
SVD_0544.JPG

नांदेड : जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नांदेड शहरातील पीरबुऱ्हाणनगरमध्ये आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील १४ व्यक्तींसह ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५० जणांना ‘एनआरआय’ यात्री निवासात क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, पीरबुऱ्हाणनगरच्या परिसराला कंटेंटमेंट एरिया घोषित करून अडीचशे पथकांच्या माध्यमातून दहा हजार नागरिकांची तपासणी करण्यात करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.

अन् सर्वांचीच झोप उडाली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलिस व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून मागील दीड महिन्यापासून डोळ्यात तेल घालून मेहनत घेत होते. याला यशही आल्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु, बुधवारी (ता. २२) औरंगाबाद येथे पाठविलेल्या स्वॅब तपासणीत पीरबुऱ्हाणनगरमधील एका बॅंकेतून सेवानिवृत्त झालेला ६४ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर होताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

तातडीची बैठक घेवून केल्या उपाययोजना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी तातडीची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. यात त्या रुग्णाच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या ५० नागरिकांनाही एनआयआर यात्री निवास येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. बाधिताला तपासणाऱ्या दोन खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व तेथील स्टॉफलादेखील क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दहा हजार नागरिकांची तपासणी 
पीरबुऱ्हाणनगर व लगतच्या परिसरातील सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृदांवन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर हा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या भागाचे निर्जंतुकीकरण करून प्रत्येक घरातील नागरिकांच्या तपासणीसाठी अडीचशे आरोग्य पथकांची नियुक्ती करून बुधवारी दहा हजार नागरिकांना तपासण्यात आले आहे. यापुढेही १४ दिवस या भागातील नागरिकांची तपासणी होणार आहे. तसेच या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या दूधला, गॅसवाला व इतरांचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी सामाजिक अंतर पाळून वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com