२५ कुटुंबांतील ६९ कामगारांना केले क्वारंटाइन

kandhar.jpg
kandhar.jpg


कंधार, (जि. नांदेड) ः तालुक्यातील शिराढोण तांडा व पांगारा येथील ऊसतोड कामगार लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवून ट्रॅक्टरने मजल - दरमजल करीत मंगळवारी (ता. १४) रात्री शिराढोणपर्यंत आल्याची माहिती समजताच कंधार प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी सकाळपासून २५ कुटुंबांतील ६९ जणांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शिराढोण येथील आश्रम शाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे.


लॉकडाउनचा नियम धाब्यावर
कोरोनाच्या पार्शवभूमीवर भारतभर लॉकडाउन करण्यात आले आहे. जे बाहेर गावी गेले ते तेथेच अडकून पडले. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची मुदत असल्याने बाहेरगावी अडकलेल्या कामगार कसेबसे तग धरून होते. १४ एप्रिलला पंतप्रधान मोदींनी लॉकडाउनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा करताच बाहेरगावी असणाऱ्यांचा संयम सुटला. ते मिळेल त्या वाहनाने लॉकडाउनचा नियम धाब्यावर बसवून आपल्या गावाकडे निघत आहेत.

लॉकडाउनचे नियम मोडून गावाकडे निघणाऱ्यामध्ये कंधार तालुक्यातील शिराढोण तांडा आणि पांगारा येथील २५ कुटुंबांतील ६९ लोकांचा समावेश होता. हे सर्व लोक नागपूरपासून शंभर किलोमीटर दूर ऊसतोडीसाठी गेले होते. लॉकडाउनची मुदत वाढल्याने हे सर्व लोक ट्रॅक्टरने पाहरा चुकवत चुकवत मंगळवारी शिराढोणपर्यंत पोचले. नागपूरहून ६९ ऊस कामगार आल्याची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सखाराम मांडवघडे, नायब तहसीलदार विजय चव्हाण, मंडळअधिकारी शेख यांच्यासह पोलिस व आरोग्य विभागातील पथक बुधवारी शिराढोण येथे धडकले. नागपूरहून आलेल्या सर्व लोकांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शिराढोण येथील आश्रम शाळेत क्वारंटाइन करण्यात आले. त्या सर्वांच्या जेवणाची सोय करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com