esakal | सेलू पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह; २३ दुचाकी चोरट्यांनी केल्या लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

सेलू (जिल्हा परभणी) पोलिस

सेलू पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह; २३ दुचाकी चोरट्यांनी केल्या लंपास

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी ) : गेल्या दोन महिन्यांपासून सेलू शहराच्या विविध भागांतून दिवसा आणि रात्री दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे. दोन महिन्यांत तब्बल २३ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांचा शोध लागत नसल्याने सेलू पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सेलू शहरातील विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरटे आणि दुचाकी विकत घेतलेल्या चार अशा सात जणांना ( ता. चार ) रोजी सेलू पोलिसांच्या पथकाने अटक करुन त्यांच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या. परंतु शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा अद्यापही शोध लागलेला नाही. दुचाकी चोरट्यांनी जालना जिल्ह्यातील आष्टी, लिखीत पिंप्री, वाटूर फाटा, मंठा, पाटोदा, केदारवाकडी, जालना सेलू तालुक्यातील मोरेगाव, गव्हा आणि शहरातील शिक्षक कॉलनीतील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. मात्र शहरातील आदर्शनगर, पारीख कॉलनी, शास्त्रीनगर, मारुतीनगर, पारिजात कॉलनी तसेच अन्य भागांतून चोरीला गेलेल्या २३ दुचाकींचा अद्याप शोध लागलेला नाही.

हेही वाचा - महावितरणचा मानव संसाधन विभाग; सॅप- ईआरपी प्रणालीमुळे झाला हायटेक

विशेष म्हणजे दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही रविवारी एक दुचाकी चोरीला गेली. त्यामुळे जिल्ह्याबाहेरुन दुचाकी चोरी आणि शहरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या दोन टोळ्या कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नंबर नसलेल्या आणि संचारबंदीचे पालन न केल्याने पोलिसांनी अनेक दुचाकी पोलिस ठाण्यात आणून लावल्या होत्या. त्यातील काहींनी कागदपत्रे दाखवून आणि दंड भरुन दुचाकी नेल्या, परंतु २५ ते ३० दुचाकी परत नेण्यासाठी कोणीच आले नाही. सेलू शहरात चोरीच्या दुचाकीच्या संख्येत वाढ झाल्याने वाहनधारक अस्वस्थ झाले आहेत. घरासमोरुनच दुचाकी लंपास होत असल्याने शहरात पोलिसांनीच गस्त वाढवण्याची गरज असल्याची सेलूकरांतून मागणी होत आहे.

येथे क्लिक करा - सरकारने लर्नर लायसन्सच्या प्रक्रियेतसुद्धा बदल केला आहे. यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे यांची ( ता. आठ ) रोजी परभणी येथे पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी नविन पोलिस निरिक्षक येईपर्यंत व नविन पोलिस निरिक्षकांच्या कामकाजावरुन वाहनधारकांना चोरी झालेल्या दूचाकी केंव्हा परत मिळतील असा यक्ष प्रश्न पडला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top