
मुंबई : मराठी साहित्य आणि वाङ्मय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास देण्यात येणारा मानाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०२४) ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.