Rabid Dog Terror in Malegaon: Seven Citizens and Cattle Injured
sakal
देगलूर : तालुक्यातील मौजे माळेगाव (मक्ता) येथे एका पिसाळलेल्या श्वानाने दोन दिवसांत अक्षरशः हैदोस घालत सात नागरिकांसह काही मुक्या जनावरांनाही चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन वृद्ध महिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.