Beed Crime : परळीतील फड टोळीवर ‘मकोका’; बीड पोलिसांची कारवाई, १० गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग
MCOCA : बीड जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या रघुनाथ फड टोळीविरोधात पोलिसांनी मकोकांतर्गत कठोर कारवाई केली आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्रसाठा यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
बीड : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी परळी शहर व आजूबाजूच्या परिसरात गंभीर गुन्हे करणाऱ्या रघुनाथ फड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली.