रेल्वेची मोठी दुर्घटना टळली; इंजिन पुढे, डबे पाठीमागे 

railway
railway

औरंगाबाद : अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसची कपलिंग अचानक तुटल्याने इंजिन पुढे निघून गेले तर डबे पाठीमागेच राहिले. दौलताबाद रेल्वे स्थानकाच्या पुढे निघाल्या नंतर ही घटना घडली. सुदैवाने काही अंतरावर डबे थांबले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

अमृतसरहुन नांदेडकडे जाणार्‍या सचखंड एक्सप्रेसने (शनिवार ता. 2) रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दौलताबाद रेल्वे स्टेशन सोडले. त्यानंतर काही क्षणात रेल्वेची कपलिंग तुटली. कपलिंग तुटल्यामुळे इंजिन भरधाव वेगात पुढे निघून गेले. तर डबे हळूहळू वेग कमी होत होत थांबले.

रेल्वे चालकाच्या लक्षात आल्यानंतर, पुन्हा इंजिन पाठीमागे आणून रेल्वेला जोडण्यात आले. विशेष म्हणजे इंजिन जोडून रेल्वे निघाल्या नंतर पुन्हा दुसऱ्यांदा शरणपूर जवळ कपलिंग तुटली. पुन्हा रेल्वे इंजिन पुढे निघून गेले व डब्बे पाठीमागे राहिले. कपलिंग जोडण्याचे काम सुरू करण्यात आले, त्यानंतर साडेबारा वाजता रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. रेल्वेची दोन वेळा कपलिंग तुटल्यामुळे जवळपास दीड ते दोन तास रेल्वे लेट झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com