
परभणी : पुढील तीन दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ता. २९ मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.