Rain Break Disrupts Pola Festival Bulls Groomed With Borewell Water
sakal
चित्तेपिंपळगाव - पावसाने घेतलेल्या मोठ्या खंडामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा पोळा सण दरवर्षी उत्साहात साजरा होत असतो, मात्र यंदा पावसाने तब्बल दिड महिन्यांपासून दडी मारल्याने पाण्याअभावी यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.