ग्राहकांकडून तक्रारींचा पाऊस, कशामुळे ते वाचा...

light
light

परभणी ः गेल्या चार महिण्यापासून लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांचे आलेल्या बीलाचे आकडे पाहून रक्तदाबच वाढला. परिणामी महावितरणकडे वाढीव बील कमी करण्यासाठी ग्राहकांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊसच पडला. परंतू, ग्राहकांना आलेले बील हे त्यांच्या वापरानुसारच आले असल्याचे स्पष्टीकरण महावितरणने केले आहे. 

लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रिडींग बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये कुटूंबातील सर्वच व्यक्ती घरातच असल्याने घरातील विद्युत उपकरणे जास्त वापरली जात होती. वेबपोर्टल व मोबाइल अॅपद्वारे स्वतः हून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापरानुसार बीले देण्यात आली होती असे महावितरणचे म्हणने आहे. मात्र, एप्रिल व मे महिण्यात स्वतःहून मीटर रिडींग न पाठविणाऱ्या ग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीज वापरानुसार बिल पाठविण्यात येत आहेत. असे असले तरी वाढीव बिलामुळे ग्राहकांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. 

ग्राहकांनी महावितरणचा दरवाजा ठोठावला
अनेकांनी आमचा वीज वापर कमी असतानाही बील मात्र जास्त आले आहे असे म्हणत सरळ महावितरणच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. या ठिकाणी तक्रारींचा पाऊसच पडला. त्यामुळे महावितरणचे अधिकारी ही चांगलेच त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या संदर्भात महावितरणचे वेबिनार घेवून मार्गदर्शन केले आहे. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक शाखा कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

काय म्हणते महावितरण 
जानेवारी, फेब्रुवारी महिण्यात थंडी असल्याने आपला वीज वापर कमी असतो. व त्या महिण्यातील वापरानुसारच सरासरी युनिट व एमसीआरच्या निर्देशानुसार देण्यात आले. उन्हाळ्यातील एप्रिल व मेमध्ये झालेल्या वीज वापरापेक्षा कमी आहे. एप्रिल व मेमध्ये कमी सरासरी युनिटने बिल आल्याने व वास्तविकमध्ये सदर महिण्यात त्यापेक्षा जास्त वापर झाल्याने आपणास बील जास्त आल्याचे वाटते असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अडचणी असतील तर महावितरणशी संपर्क करा
जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना योग्य पध्दतीने वीज बील वाटप झाले आहे. अद्याप काही ग्राहकांना अडचणी असतील तर महावितरण कार्यालयाशी संपर्क करून वीज बील भरणा करावा. - प्रवीण अन्नछत्रे, अधिक्षक अभियंता, महावितरण 

ठळक बाबी 
- लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष रिडींग नोंदणी बंद 
- सर्व ग्राहकांना एप्रिल व मे महिण्याचे सरासरी बील 
- उन्हाळ्यात वीज वापर जास्त 
- जाने - फेब्रुवारीमध्ये वीज वापर कमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com