

Beed News
esakal
अंबाजोगाई: रणरणत्या उन्हात जमिनीची लाहीलाही होत असताना आणि पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असताना झाडे लावणे म्हणजे मोठे आव्हान असते. मात्र, अंबाजोगाईतील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरात या आव्हानावर मात करणारा एक प्रयोग आकाराला आला आहे. एरवी आपण झाडाच्या आळ्यात पाणी टाकतो, पण येथे मात्र पाणी थेट झाडाच्या मुळाशी पोचवले जात आहे. रेन हार्वेस्टर पद्धतीचा वापर करून या संस्थेच्या परिसरात भर उन्हाळ्यातही मोठ्या उत्साहात वृक्षलागवड केली जात आहे. केवळ झाड लावणे नव्हे, तर ते शास्त्रीय पद्धतीने जगवण्याचा हा पॅटर्न सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.