
धाराशिव : काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा काहीसा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मंगळवार (ता. २६) ते २९ ऑगस्टदरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीसह रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेश, विदर्भ, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.