- धनंजय शेटेभूम - 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्यप्रमाने प्रवासांची सेवा करण्याचा वसा उचललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूम विभागाकडून ऐन पावसाळ्यात गळकी गाडी देऊन प्रवाशांचा छळ चालवला असल्याचा प्रकार आज उघडकीला आला आहे..या संताप जनक घटनेची माहिती अशी की, भूम आगारातून नियमितपणे सकाळी सात वाजता निघणाऱ्या भूम -मिरज या गाडीला आज (ता. १०) रोजी एसटी बस बार्शी येथून सांगोल्यापर्यंत पाऊस होता. या दरम्यान बसमध्ये २० प्रवासी होते या प्रवाशांना बस मध्ये सीटवर बसता येत नव्हते. कारण बसच्या टपावरून बस मध्ये सर्वत्र गळती मुळे पाणी झाले होते..याबाबत प्रवाशांनी माध्यमांकडे तक्रार केल्यावर आम्ही या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी केली असता, भूम आगारातून नियमितपणे जाणारी एम एच १३ सी यू ८३४६ भूम -मिरज ही बस मिरजला न देता सदरची बस आज रिमार्क असतानाही गाडी लोकलसाठी वापरण्याचा रीमार्क असतानाही सदर गाडी भूम सोलापूरसाठी देण्यात आली.तर एम एच २० बी एल १९७० या गाडीला दोन खिडक्या नसल्याचा रिमार्क असतानाही ही गाडी मिरजसाठी दिली. यामुळे कुर्डूवाडी पंढरपूर मिरजसाठी जाणाऱ्या प्रवाशांना एसटीमध्ये बसून सुद्धा पावसाचा आनंद गळक्या असणाऱ्या बसमध्ये घ्यावा लागला. व या त्रासाला सामोरे जात प्रवास करावा लागला..नुकतेच एसटीचे महाव्यवस्थापक अनघा बारटक्के यांनी भेट देऊन भूम आगाराचा कारभार लवकरच सुधारेल अशी ग्वाही दिली होती. परंतु कारभार जसे तसे रामभरोसे चालू आहे. आजची दुसरी घडलेली घटना अशी की, भूम आगारातून सकाळी सव्वासात वाजता निघणाऱ्या भूम -लातूर बस कहर झाला आहे.सदर बस क्र.एम एच २० बी एल १९६८ ही गाडी भूमवरून लातूरसाठी गेली होती. सदरच्या बसमधील इंजन मधून ऑइल गळत असल्याने बसची स्टेरिंग जॅम झाल्यामुळे गाडी सकाळी ८:३० वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत वाशी बस स्थानकावरती उभी होती. त्यानंतर दुपारी एक वाजता भूम आगारातून रिलीफ म्हणून एम एच २० बी एल ४२१८ सदरची गाडी वाशी येथे गेली..गाडीला उशीर झाल्यामुळे सदरची बस लातूरला न जाता थेट धाराशिव येथे पाठवण्यात आली. सदर बसमध्ये भूम ते लातूर असा प्रवास करणारे आठ प्रवासी वाशी वरून पंधरा ते वीस प्रवासी लातूरचे होते. सदर प्रवाशांना पाच तास वाशी बस स्थानकात बसून मनस्ताप सहन करावा लागला.याबाबत अधिक चौकशी केली असता गाडी खराब झाल्याचे भूम आगारात लवकर सूचना देऊन ही भूम ते वाशी २५ किलोमीटरचे अंतर जाण्यासाठी भूम आगाराच्या यांत्रिकी कर्मचाऱ्यांना पाच तास लागले. परंतु गाडी मात्र लातूरला गेलीच नाही. यामुळे लातूर गाडीचे तिकीट घेतलेल्या प्रवाशांना येडशीहून दुसऱ्या एसटी बसने जावे लागले..एकंदरीत या प्रकारावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भूम येथील अधिकाऱ्यांना भूम येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. येत्या १२ तारखेला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येणार आहेत. मंत्री महोदय तरी या गोष्टीकडे लक्ष देऊन 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य यशस्वी करतील का?अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे..या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत प्रभारी आगार प्रमुख श्रीकांत सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता बसेस जुन्या असल्याने आहे त्याच बस मार्गस्थ कराव्या लागत आहेत. असे सांगून हतबलता व्यक्त केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.