esakal | नांदेड : तीन तालुक्यासह 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

rain

नांदेड जिल्ह्यात श्रावण महिना संपताच शुक्रवारी  पोळ्याच्या दिवशी रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी रात्री ही जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हा पाऊस मुतखेड तालुक्यात 149. 33 मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेड : तीन तालुक्यासह 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड  : नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे मुदखेड, अर्धापूर व नायगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या तीन तालुक्यासह 19 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हा पाऊस टंचाईग्रस्त भागात असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रविवारी (ता. एक) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण 778 मिलिमीटर नुसार सरासरी 48.63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात श्रावण महिना संपताच शुक्रवारी  पोळ्याच्या दिवशी रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी रात्री ही जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हा पाऊस मुतखेड तालुक्यात 149. 33 मिलिमीटर पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यात 98.33 मिलिमीटर व नायगाव तालुक्यात 87.40 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यासोबतच कंधार महसूल मंडळात 67, पेठवडज 75, फुलवळ 65, मुदखेड 127, मुगट 156, बारड 165, शेवडी 75, नायगाव 118, बरबडा 73, कुंटूर 117, नरसी 81, अर्धापूर 140, दाभड 87, मालेगाव 68, बिलोली 65, लोहगाव 70, मुखेड 68, जांब 70 व चांडोळा 80 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यासोबतच जिल्ह्यातील इतर 27 मंडळातही चांगला पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.

यासोबतच खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. टंचाईग्रस्त भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न तूर्तास मीटला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात सध्या मुगाची तोडणी सुरू आहे; परंतु या पावसामुळे या कामाला बाधा पोहोचली.  जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ पर्यंत एकूण 778 मिलिमीटर नुसार सरासरी 48.63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण आजपर्यंत 569. 44 मिलिमीटर नुसार 59.59% पावसाची नोंद झाली आहे.

loading image
go to top