esakal | हिंगोली जिल्ह्यात बरसला पाऊस

बोलून बातमी शोधा

Hingoli News

जिल्हाभरात रविवारी सायंकाळच्या सुमारास काही मिनीटे जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात बहुतांश गावात झालेल्या पावसाने सायंकाळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने शोधाशोध करण्यासाठी गावकऱ्यांना धावपळ करावी लागली.  

हिंगोली जिल्ह्यात बरसला पाऊस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
हिंगोली : जिल्‍ह्यात रविवारी (ता. ३१) सेनगाव, औंढानागनाथ तालुक्यासह हिंगोली तालुक्यात पावसान हजेरी लावली. या वेळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने शोधाशोध करण्यासाठी ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली. काही मिनिटे आलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला होता.

दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. सकाळी ढगाळ वातावरण राहात असून दुपारी कडक ऊन पडत आहे. सायंकाळी परत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. रविवारी सकाळी जिल्‍ह्यात ढगाळ वातावरण होते.

हेही वाचा - Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी ​

अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली

 सायंकाळी पाचच्या सुमारास सेनगाव तालुक्‍यातील आजेगाव, ताकतोडा, वाघजाळी, केंद्रा बुद्रुक, बटवाडी, मन्नास पिंपरी, गोंधनखेडा, जामठी बुद्रुक, कहाकर, वरखेडा आदी गावांत वीस ते पंचवीस मिनिटे पाऊस झाला. या वेळी आजेगाव येथे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. पाऊस थांबल्यानंतर पत्रे शोधण्यासाठी गावकऱ्यांची धावळप झाली होती.

सखल भागात पाणी साचले

 औंढा तालुक्‍यातील येहळेगाव सोळंके, धारखेडा, बोरजा, दुधाळा, हिवरा, जडगाव, सुरेगाव या गावांतदेखील पाऊस झाला. हिंगोली शहरासह तालुक्‍यातील कोथळज, बळसोंड, कनेरगावनाका, मोप, फाळेगाव, अंधारवाडी, कारवाडी, खांबाळा, पांगरी, बोराळा, भांडेगाव, कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा बाळापूर, डोंगरगाव पूल, शेवाळा, पोतरा, बोल्‍डा, येहळेगाव गवळी, कवडा, जांब, असोला, वसमत शहरासह तालुक्‍यातील गिरगाव, कुरुंदा, पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खांबाळा आदी गावात पाऊस झाला. या पावसाने सखल भागात पाणी साचले होते.
दरम्‍यान, या पावसाने मशागतीच्या कामांना वेग येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

झाडावर वीज कोसळली

औंढा नागनाथ तालुक्‍यातील शिरडशहापूर येथे सायंकाळी साडेसहाच्या दरम्‍यान वादळी वारे व विजेचा कडकडाट सुरू झाला. यावेळी एका नारळाच्या झाडवर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. वेळीच आग विझविल्याने आग आटोक्‍यात आली.  

बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

लॉकडाउनमुळे बहुतांश शेतकरी शेतातच थांबत आहेत. त्यामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरी खते, बियाणे खरेदीकरण्यासाठी बाजारपेठेत येत आहेत. आतापासूनच खताचे नियोजन लावले जात असून आता पावसामुळे या कामांना गती येणार आहे.

येथे क्लिक करा - परभणीत स्वॅब तपासणारी प्रयोगशाळा बंद; कारण गुलदस्त्यात

शिवरस्ता कामास सुरवात

गिरगाव : वसमत तालुक्यातील माळवटा-मुंरुबा-बोरगाव या शिवरस्त्याच्या कामास सुरवात झाली असून जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे यांच्या पुढाकारातून हे काम केले जात आहे.
माळवटा, मुंरुबा, बोरगाव बुद्रुक या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांची सातशे ते आठशे एकर जमीन या मार्गावर आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील होत होते.

शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त

 यासाठी शेतकऱ्यांनी ही बाब जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे यांना सांगितली. त्यांनी स्‍वतःच्या जेसीबीने दोन किलोमीटर रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी सरपंच विठ्ठल लडके, चेअरमन बाबूराव नादरे, गंगारामबापू वारे, केशवराव वारे, गजानन खारोडे, बाळू मिटकरी, महादू साखरे, शिवाजी गोधावळे, दुर्गाजी लिंगायत, खंडू वाघमारे आदी शेतकरी उपस्थित होते.