
छत्रपती संभाजीनगर : ‘पालकमंत्री संजय शिरसाट यांनी निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटले’, असा आरोप पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी केला. त्यांची विधानसभा सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करावी या मागणीसाठी शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. प्राथमिक सुनावणीत न्यायमूर्ती के.सी. संत यांनी प्रतिवादी राज्य शासन, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि मंत्री शिरसाट यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.