esakal | आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या घरासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

राजेश टोपेंच्या घरासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठिय्या

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना: कोविडमध्ये जीवाची परवा न करता कोरोना रूग्णांवर उपचार करण्याऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना शासनाने कोरोना आटोक्यात आल्याने ता.१ जुलैपासून नारळ दिला. त्यामुळे संतप्त कंत्राटी आयोग कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.५) जालना येथील रिषी पार्क येथील आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या घरासमोर सुमारे भर उन्हात सुमारे दोन तास ठिय्या मांडला.

आरोग्य विभागात निघणाऱ्या 16 हजाराची पदभरती व वैद्यकीय महाविद्यालयातील पदभार न करता कोरोना महामारीत काम करणाऱ्या कंत्राटी परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांची भरती करावी. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला 50 लाखांची तत्काळ मदत द्यावी. आरोग्य सेवा भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेता येत नसेल तर 50 टक्के जागा या राखीव ठेवा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: ऑगस्ट अखेरपासन मान्सून दाखविणार रंग!

कंत्राटी कर्मचारी परिषद या संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान पोलिस व काही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

loading image
go to top