

Rajoo Jodha Pawar arrest case
sakal
कन्नड : तालुक्यातील जामडी (फाँरेस्ट) येथील माजी सरपंचाचा मुलगा राजू रामचंद्र पवार (४५) यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील तिसरा आरोपी राजू जोधा पवार (५१) याला कन्नड ग्रामीण पोलिसांनी रविवारी (ता. २५) अटक केली. १३ जानेवारी रोजी राजू पवार यांचा मृतदेह जामडी येथील वनपरिसरातील नाल्यातील पाण्यात निर्वस्त्र व गुप्तांग कापलेल्या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात त्यांच्याच गावातील वंदना राजू पवार (४५) व तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा (१८) यांनी हत्या केल्याचे सुरुवातीच्या तपासात निष्पन्न झाले होते.