सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या राजश्री निकम  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या राजश्री निकम 

सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या राजश्री निकम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिल्लोड (जि. औरंगाबाद) - सिल्लोड नगर परिषदेवर असलेली कॉंग्रेसची सत्ता कायम ठेवत आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांची धुळधाण केली. नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या राजश्री राजरत्न निकम या मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाल्या. त्यांनी भाजपाचे उमेदवार ऍड.अशोक तायडे यांचा 10 हजार 882 मतांनी दणदणीत पराभव केला. "एमआयएम'चे उमेदवार प्रभाकर पारधे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

नगर परिषदेच्या तेरा प्रभागातील 26 जागांपैकी 24 जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपच्या रूपाली मनोज मोरेल्लू यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार हिराबाई विश्वनाथ क्षीरसागर यांचा पराभव केला. याच प्रभागात भाजपच्या अश्विनी किरण पवार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माजी नगराध्यक्ष शंकरराव खांडवे यांना पराभूत केले. या दोन महिला उमेदवारांच्या विजयाने भाजपला खाते उघडता आले. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

loading image
go to top