Ajit Pawar
sakal
फुलंब्री - तालुक्यातील पाथ्री गावाच्या विकास प्रवासात एक असा क्षण आहे, जो आजही गावकऱ्यांच्या स्मरणात जिवंत आहे. सन २००१ या काळात अजित पवार हे राज्याचे जलसंपदा व ऊर्जामंत्री असताना पाथ्री येथे नवीन पाण्याच्या टाकीचे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले होते. त्यावेळी गावात विकासाची नवी आशा निर्माण झाली असल्याचे सांगताना राजेंद्र पाथ्रीकर यांना अश्रू अनावर झाले.