नक्षलवादी हल्ल्यात दादा गेला अन् आधार हरवला

Raju Gaikwad
Raju Gaikwad

मेहकर : गरिबी आणि त्यामधून जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश पदरात पडता येते यांचा शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील एक जिवंत उदाहरण म्हणून राजू गायकवाड यांच्याकडे पाहिले जात होते. प्रभागतील युवकांना जमलं ते सहाय्य करणारा आधारवड काळाच्या पडद्याआड केला आहे. गडचिरोली हल्ल्यातील हुतात्म्यामध्ये राजू गायकवाड यांचे नाव समोर येताच येथील युवकांनी दादा... आमचा आधार हरविला असा एकच दोहा फोडला.

शहरातील प्रभाग क्रमांक 7 अण्णाभाऊ साठे नगर मधील रहिवाशी असलेले व गडचिरोली येथे पोलिस कार्यरत राजू गायकवाड (वय 33) यांचा आज गस्तीवर असलेल्या 15 जवानांवर माओवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग हल्ल्यात समावेश होता. यामध्ये त्यांना हुतात्म आले आहे.

राजू गायकवाड हे 1 फेब्रुवारी 2011 मध्ये गडचिरोली पोलीस दलात दाखल झाले होते. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कमवा आणि खा अशी. आईने राजू यांना काबाडकष्ट करून शिकविले. राजू यांनी लहानपणापासून पाहिलेली परिस्थितीमुळे आईच्या कष्टाला मेहनतीची साथ देत पोलिसात नोकरी मिळविली. पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी 3 वर्ष व मुलगा 4 महिण्याचे असून पत्नीसोबत ते गडचिरोली येथे राहत होते. आज झालेल्या घटनेची माहिती मिळताच आई वडील व इतर परिवार गडचिरोली येथे दाखल झाले आहे. सदरची घटना ही 1 मे कामगार दिवसाच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com