Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे सहभागी होऊन दिला पाठिंबा
Raju Navghare: मराठा आरक्षण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे सहभागी झाले आहेत. त्यांनी बांधवांसाठी भोजन व पाण्याची सोय करून थेट समर्थन दर्शवले.
हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चात वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे हे ग्रामस्थांसोबत सहभागी झाले आहेत. वाटेत त्यांनी ठिकठिकाणी पाणी आणि अल्पोहाराची सोय केली आहे.