
Raju Shetty
sakal
तिवसा, (जि. अमरावती): ‘‘वयाच्या पंचविशीत आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरू केला आणि आज साठी ओलांडूनही तो थांबलेला नाही. सरकारे बदलली, धोरणे बदलली, पण शेतकऱ्यांची अवस्था मात्र बदलली नाही. म्हणूनच आता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची ‘वज्रमूठ’ तयार ठेवली पाहिजे. जाती, धर्म, पंथ, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन एकत्र आल्याशिवाय शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत,’’ असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.