
वडीगोद्री : मराठवाड्यातील साखर कारखानदार एकरकमी एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. थकीत एफआरपी व्याजासह वसूल केल्याशिवाय मराठवाड्यातील कारखानदारांना मी सोडणार नाही, मराठवाड्यातील साखर कारखान्यांवर एफआरपीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.१२) वडीगोद्री येथे दिला.