Jalna Road Accident : भाऊबीजेच्या दिवशीच दोन बहिणींवर कोसळला दुःखाचा डोंगर; राजूरजवळ ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत १५ वर्षीय एकुलत्या भावाचा जागीच मृत्यू

Teen Kabaddi Player Dies in Tractor Bike Collision : जालना जिल्ह्यातील राजूरजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन १५ वर्षीय अभिषेक तायडे याचा मृत्यू झाला. भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Teen Kabaddi Player Dies in Tractor Bike Collision

Teen Kabaddi Player Dies in Tractor Bike Collision

esakal

Updated on: 

राजूर (भोकरदन) : राजूर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील राजूरपासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या चनेगाव येथील एका तरूणाचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. अभिषेक संजय तायडे (वय १५ ) असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो घरातील एकुलता मुलगा होता. त्याला दोन मोठ्या विवाहित बहिणी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बुधवारी सायंकाळी राजूर येथून वाढदिवसाचा केक घेऊन Hero Deluxe (क्र. MH 21 BE 3165) मोटरसायकलने गावाकडे जात होता. त्याचे गाव अवघ्या १ किलोमीटरवर राहिले असताना, संध्याकाळी ६:३० ते ७:०० च्या सुमारास समोरून येणाऱ्या अद्रकने भरलेल्या ट्रॅक्टरशी त्याची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Loading content, please wait...