

Beed News
esakal
शिरूर कासार: नवगण राजुरी-खरवंडी कासार राष्ट्रीय महामार्ग (एनएच-३६१) आठ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून, कामाच्या विलंबामुळे शासनावर सुमारे २८ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ३७ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती आणि १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही.