
लातूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. सामाजिक समतोलासाठी हे महत्त्वाचे आहे. सध्या आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जाते. ते एक लाख झाले पाहिजे, याकरिता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.