Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा
Athawale on Rahul Gandhi and Lok Sabha Protocol: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लातूर दौऱ्यावर काँग्रेसच्या विरोधाबद्दल टीका केली. राहुल गांधींना बोलण्यास अडथळा नाही, नियम मोडल्यास माईक बंद होतो, असे त्यांनी सांगितले.
लातूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नाही, असे सांगितले जाते. पण, आम्ही कधीच त्यांचे तोंड बंद केले नाही. राहुल गांधी उत्तम भाषणे करतात. मात्र, लोकसभेत बोलताना नियमात राहूनच बोलावे लागते.