Jalna Temples: लोकवर्गणीमधून ठिकठिकाणी उभारली २५ मंदिरे;रामानंद सरस्वती महाराजांचा पुढाकार, गावांमध्ये भक्तिमय वातावरण
Rural Temples: रामानंद सरस्वती महाराज यांनी लोकवर्गणीतून २५ मंदिरे उभारली असून त्यातून गावागावात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. विविध ठिकाणी हेमाडपंती शैलीतील मंदिरांची उभारणी केली गेली आहे.
अंबड : रामानंद सरस्वती ऊर्फ राजयोगी ऊर्फ रामदास महाराज यांनी ३० वर्षांपूर्वी संन्यास घेऊन उर्वरित आयुष्यात धार्मिक कार्य करण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी शिव मंदिरांसह विविध देवतांच्या मंदिरांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला.