Latur Crime: रामलिंग मुदगड येथे ३४ वर्षीय तरुणाचा खून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Latur News: मदनसुरी तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे ३४ वर्षीय गुलाब खरोसे यांचा गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतदेह व मोटारसायकल गावाच्या शिवारातील रस्त्यालगत आढळून आले.
मदनसुरी, (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे एका ३४ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी (ता. १८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.