Kannad Bribe Case : पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात कारवाई

लाकडाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या गाडीची वाहतूक करण्यास अडथळा न आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सात हजार रुपयांची लाच मागितली.
Range Forest Officer shivaji tompe

Range Forest Officer shivaji tompe

sakal

Updated on: 

कन्नड - लाकडाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या गाडीची वाहतूक करण्यास अडथळा न आणण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी पाच हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून कन्नडचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी नागनाथ टोम्पे (वय-३५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. १६) पकडले. कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारी ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com