कळमनुरीच्या आजी माजी आमदारांमध्ये रंगली चर्चा

satkar foto
satkar foto

हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्‍या निवडणुकीत एकमेंकांविरुद्ध दंड थोपटून रिंगणात उतरलेल्‍या व आरोप प्रत्‍यारोप करणाऱ्या आजी माजी आमदारांमध्ये शनिवारी (ता.१६) चर्चा रंगली. यावेळी विकासकामांबाबत चर्चाही झाली.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार संतोष टारफे व शिवसेनेकडून आमदार संतोष बांगर निवडणूक रिंगणात होते. निवडणूक प्रचाराच्‍या काळात स्‍थानिक पातळीवरील विकासाची मुद्दे तसेच आरोप प्रत्‍यारोप चांगलेच रंगले. त्‍यामुळे दोन संतोषपैकी कोणता संतोष बाजी मारणार? याची उत्‍सुकता होती. अटीतटीच्‍या लढतीत शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.

संतोष बांगर यांनी केला मतदारसंघाचा दौरा  
विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्‍यानंतर आमदार संतोष बांगर यांनी मतदारसंघातील अनेक गावांत भेटी दिल्‍या. परतीच्‍या पावसामुळे अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आमदार बांगर यांनी केले. तसेच पीकविम्‍यासाठी शासनस्‍तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, कळमनुरीची काँग्रेसची जागा शिवसेनेने हिसकावल्‍याने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते अडचणीत सापडले होते.

दोन संतोषच्‍या भेटीने राजकीय चर्चेला पूर्णविराम
कळमनुरी मतदारसंघात विजयी झालेले शिवसेनेचे संतोष बांगर यांनी आज माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्‍या निवासस्‍थानी जावून भेट घेतली. या वेळी त्‍यांनी राज्‍यातील राजकीय हालचालीवर चर्चा केली. तसेच मतदारसंघातील विकासकामाबाबतही चर्चा केली. दोन संतोषच्‍या भेटीने राजकीय वर्तुळाला संतोष झाला आहे.

दोघे मिळून साधणार विकास
राज्‍यात महाशिवआघाडी स्‍थापन झाल्‍याचे निश्चित झाले आहे. त्‍यामुळे स्‍थानिक पातळीवर काँग्रेसच्‍या माजी आमदारांना सोबत घेवून विकास करावा लागणार आहे. या दृष्टिकोनातूनच ही भेट झाल्‍याचे मानले जात आहे. आजी माजी आमदार एकत्र येण्याने विधानसभा मतदारसंघात विकासकामे निश्चित होतील, असेही बोलले जात आहे.


कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्‍या विकासाचे आश्वासन निवडणुकीच्‍या वेळी दिले होते. त्‍यानुसार मतदारसंघात विकासकामांसाठी राजकीय मतभेद विसरून आपण माजी आमदार डॉ. टारफे यांची भेट घेतली. निवडणुकीतील आरोप प्रत्‍यारोप निवडणुकीनंतर संपले. आता फक्‍त विकासालाच प्राधान्य देणार.
-आमदार संतोष बांगर


माजी आमदार डॉ. टारफे यांच्‍या निवासस्‍थानी भेट दिल्‍यानंतर आमदार बांगर यांनी राजकीय हालचालीवर चर्चा केली. तसेच विधानसभा मतदारसंघात कोणती विकासकामे करणे तातडीने गरजेचे आहे याची माहिती त्‍यांनी घेतली. त्‍यामुळे विकासकामांना गती येईल.
- माजी आमदार डॉ. संतोष टारफे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com