आळंदच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात नेऊन बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

आळंद (ता. फुलंब्री) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन, पुणे परिसरातील येरवडा येथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडोद बाजार पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस गजाआड केले आहे.

फुलंब्री, ता. 1 (जि.औरंगाबाद) : आळंद (ता. फुलंब्री) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन, पुणे परिसरातील येरवडा येथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडोद बाजार पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस गजाआड केले आहे.

आळंद येथील शेख अब्दुल राजिक शेख रफिक (वय 24) याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ता. 28 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान दोन दिवस येरवडा, पुणे येथे बलात्कार केला. याबाबत वडोद बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शेख अब्दुल राजिक याच्याविरुद्ध वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोद बाजार पोलिसांनी शेख अब्दुल राजिक यास 31 ऑगस्टला पुणे येथे अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल करीत आहेत. सदर संशयित आरोपीस शनिवारी (ता. 31) न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raped Minor Girl In Pune