
विष्णू नाझरकर
जालना : ठिकठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसासोबतच आता निसर्गानेदेखील आपली किमया दाखवायला सुरवात केली आहे. जिल्ह्यात एका मोठ्या प्रजातीचा बेडूक आढळला आहे. प्रजननकाळात मादीला आकर्षित करण्यासाठी रंग बदलणारा हा बेडूक असून ‘इंडियन बुलफ्रॉग’ असे त्याचे नाव आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्या इतर बेडकांपेक्षा हा सर्वात मोठा बेडूक आहे.