
भोकरदन : तालुक्यातील देहेड येथील अडीचशे वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या वटवृक्षाच्या सान्निध्यात दुर्मिळ असणारी कान्होपात्राची म्हणजेच वाघाटीची महावेल (कॅपारिस झायले निका) आहे. विशेष बाब म्हणजे याच झाडाखाली अजून नऊ वेली यंदा उगवल्या आहेत. दरम्यान, आषाढी एकादशीला येथे तालुक्यातील विठ्ठलाचे भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.