Hingoli : हिंगोलीत वीजबिल माफीसाठी टायर जाळून रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli
Hingoli : हिंगोलीत वीजबिल माफीसाठी टायर जाळून रास्ता रोको

Hingoli : हिंगोलीत वीजबिल माफीसाठी टायर जाळून रास्ता रोको

हिंगोली : तालुक्यातील (Hingoli) कनेरगाव नाका येथे गुरुवारी (ता.२५) वीजबिल माफ करण्यासाठी शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. या संदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, तुर, कापूस, उडीद या पिकांचा समावेश आहे. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना दिले ते तोकडे आहे. विम्याचे देखील पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) विजबिल वसुली सुरू केली आहे. ते पैसे कसे भरायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना मागितली नक्षलवादी होण्याची परवानगी

त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता विजबिल माफ करावे व कृषी पंपाचा विजपुरवठा खंडित करु नये, यासाठी रास्ता रोको करण्यात आले. या वेळी नामदेव पंतगे, विठ्ठल सावके, संदीप सावके, विनोद सावके, हनुमान सावके आदी सहभागी झाले होते.

loading image
go to top