

Ration Rice Shock Seven Tooth Denture Found in Food Grain Sparks Concern Among Beneficiaries Over Government Rice Quality
sakal
जेवळी : रेशन दुकानातून पुरवठा केल्या जाणाऱ्या तांदळात चक्क दातांची कवळी आढळून आली. हा प्रकार लोहारा तालुक्यातील जेवळी येथे उघडकीस आला. जेवळी येथील विधवा महिला भागाबाई बाबूराव बिराजदार यांनी शुक्रवारी (ता. ११) गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशन आणले होते.