esakal | गरीबांच्या तोंडचा घास हिरावून गव्हाची काळ्या बाजारात विक्री 
sakal

बोलून बातमी शोधा

गरीबांच्या तोंडचा घास हिरावून गव्हाची काळ्या बाजारात विक्री 

मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून गरिबांना वितरित करण्यात येणारा स्वस्त धान्य दुकानातील गहू भोकरदनहुन सिल्लोडच्या दिशेने परराज्यात काळाबाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती भोकरदन पोलीसांना मिळाली होती. या महितीच्याआधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी अन्य सहकाऱ्यांसह रविवारी रात्री ११ वाजता भोकरदन सिल्लोड मुख्य रस्त्यावरील गुप्तेश्वर जिनिंगच्या बाजूला बसले होते.

गरीबांच्या तोंडचा घास हिरावून गव्हाची काळ्या बाजारात विक्री 

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातील साडेतीनशे पोते गहू भोकरदन पोलिसांनी रविवारी (ता.एक) रात्री उशिरा पकडला. या कारवाईत ट्रकसह जवळपास साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून गरिबांना वितरित करण्यात येणारा स्वस्त धान्य दुकानातील गहू भोकरदनहुन सिल्लोडच्या दिशेने परराज्यात काळाबाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती भोकरदन पोलीसांना मिळाली होती. या महितीच्याआधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी अन्य सहकाऱ्यांसह रविवारी रात्री ११ वाजता भोकरदन सिल्लोड मुख्य रस्त्यावरील गुप्तेश्वर जिनिंगच्या बाजूला बसले होते.

हेही वाचा - अपक्ष असतांना झाले महापौर हे कसं शक्य झालं..

यादरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सिल्लोडच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित ट्रकला त्यांनी थांबण्याचे सांगितले. असता ट्रक चालकाने वाहन काही अंतरावर जावून थांबवले व तेथून पळ काढला. यावेळी पोलीसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये गव्हाने भरलेले ३५५ पोते आढळून आले. त्यावर 'गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा कॉपी ईयर २०१७-१८ कमोडिटी वेट राईस' असा उल्लेख असून या प्रत्येकी पोत्याचे वजन अंदाजे ५० किलो आहे. याची अंदाजे किंमत २ लाख ६६ हजार २५० रुपये तर जप्त केलेल्या ट्रकची अंदाजे १० लाख रुपये एवढी किंमत असून या कारवाईत एकूण साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा -  औरंगाबादेत कचऱ्यात पैसे खाणाऱ्या कंपनीवर गुन्हा 

या प्रकरणी भोकरदन पोलिसात ट्रक चालक, मालक व ट्रक मधील गव्हाचे मालक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू साठेबाजी प्रतिबंधक अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीसांनी सांगितले. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, संदीप उगले, गणेश निकम, विजय जाधव, संजय क्षीरसागर यांनी पार पाडली. 

loading image