

Following the Ratnapur drug bust, Mephedrone (MD) has been seized at four more locations across Maharashtra, while the arrested accused have been remanded to judicial custody.
मानवत : मानवत तालुक्यातील रत्नापूर शिवारात ता. २७ जुलै रोजी मानवत पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७३ ग्रॅमपेक्षा अधिक एमडी (मेफेड्रोन) ड्रग जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणानंतर राज्यात अमरावती, कोल्हापूर, जळगाव व कळंब या ठिकाणी एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ड्रग्ज पुरवठा साखळीतील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असल्याची माहिती मानवत पोलिसांनी दिली आहे.