Beed News: अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान तरुणाने गळफास लावून संपवलं जीवन
Crop Loss: आडस तालुक्यातील २७ वर्षीय रवी आकुसकराने शेती नुकसान आणि हाताला काम नसल्यामुळे दोरीने गळफास लावून जीवन संपवलं. त्याचा परिवारआई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, भाऊ व बहीण सध्याच्या आर्थिक आणि मानसिक तणावामुळे दु:खात आहे.
केज : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान व हाताला काम नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? या विवंचनेतून एका सत्तावीस वर्षीय तरूणाने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.०९) आडस येथील सोनवळा रस्त्यालगत घडली.