esakal | नवीन वर्षापासून लागणार नाही एनईएफटी शुल्क
sakal

बोलून बातमी शोधा

file photo
  • बचत खातेधारकांच्या ऑनलाइन व्यवहाराला मिळेल चालना 
  • जानेवारी 2020 पासून हा नवा नियम लागू होणार 
  • ऑनलाइन व्यवहारास चालना मिळण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय 

नवीन वर्षापासून लागणार नाही एनईएफटी शुल्क

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : तुम्ही ऑनलाइन व्यवहार करीत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षापासून नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरसाठी (एनईएफटी) कुठलेही शुल्क लागणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार जानेवारी 2020 पासून हा नवा नियम लागू होणार आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहारास चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बॅंकांतर्फे सांगण्यात आले आहे. 


बॅंका रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि एनईएफटीच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारावर शुल्क आकारत असते. हेच शुल्क नवीन वर्षात बंद होणार आहे. आरटीजीएसचा वापर हा मोठी रक्‍कम पाठविण्यासाठी केला जातो.

डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी हे शुल्क रद्द करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने जूनमध्ये द्विमासिक बैठकीत म्हटल होते, की डिजिटलच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारासाठी लागणारे एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातून ग्राहकांकडून येणारे शुल्क आता बंद करण्यात येईल.

एक जुलैपासून एसबीआय बॅंकेने एनईएफटी आणि आरटीजीएससाठी लागणारे सर्व शुल्क रद्द करून विनाशुल्क हे व्यवहार सुरू केले. त्यासह आईएमपीएसवर लागणारे शुल्कही एक ऑगस्टपासून रद्द केले गेले. डिजिटल व्यवहारात वाढ होण्यासाठी एक जानेवारी 2020 पासून एनईएफटीवरील शुल्क रद्द केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

loading image