esakal | दिलासादायक... येलदरी भरल्याने चार दरवाजे उघडले, विद्युत निर्मितीही सुरू...
sakal

बोलून बातमी शोधा

navin

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे चार दरवाजे शुक्रवारी उघडले असून त्यातून आठ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. तसेच धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर नागरिकांनी धरण परिसरात पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

दिलासादायक... येलदरी भरल्याने चार दरवाजे उघडले, विद्युत निर्मितीही सुरू...

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर ः येलदरी धरणाचे गुरुवारी (ता.१३) रात्री पावणे अकराच्या सुमारास दोन तर शुक्रवारी (ता.१४) दुपारनंतर आणखी दोन असे चार दरवाजे ०.५ मीटरने उघडून ८४३९.४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच विद्युत निर्मितीही सुरू आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उर्ध्व भागातील खडकपूर्णा प्रकल्पातून पूर्णेच्या पात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग तसेच पाच-सहा दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्र झालेल्या पावसामुळे येलदरीच्या जलाशयातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने बुधवारी (ता.१२) सकाळी येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्पातील प्रत्येकी साडेसात मेगावॉट वीजनिर्मितीचे तिन्ही संच सुरू करण्यात येऊन सायंकाळी पाचच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे उघडले होते ते त्याच रात्री उशिरा बंद करण्यात आले होते. 

हेही वाचा - कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

जलाशयात पाण्याची आवक सुरूच 
जलाशयात पाण्याची आवक सुरूच असल्याने विद्युत निर्मिती चालु ठेवत गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा दोन आणि शुक्रवारी (ता.१४) दुपारनंतर आणखी दोन याप्रमाणे चार दरवाजे उघडून ८४३९.४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, नदी काठच्या नागरिकांनी सावध राहण्याबाबत पुर्णा पाटबंधारे विभागाने वेळोवेळी इशारा दिला असलातरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पूर्णा नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असतानाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी धरणासमोरील अरूंद पूल व परिसरात बघ्यांची गर्दी होत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठोवण्याची आवश्यकता आहे. 

हेही वाचा - स्वातंत्र्यदिनी ७८ शीख बांधव करणार आत्मदहन, कुठे ते वाचा


जिवंत पाणीसाठा ९९.६६ टक्के 
विद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे १८५० क्युसेक विसर्ग सोडला जात आहे. सद्यस्थितीत शुक्रवारी (ता.१४) सकाळी दहापर्यंत धरणातील एकूण पाणीसाठा ९३१.७२९ दशलक्ष घनमीटर तर ८०७.०५२ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा म्हणजे ९९.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. अजूनही जलाशयात पाण्याची आवक सुरूच आहे. 

विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी  
पाण्याच्या विसर्गामुळे पूर्णा नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असतानाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी धरणासमोरील अरूंद पूल व परिसरात बघ्यांची गर्दी होत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठोवण्याची आवश्यकता आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर