Vidhan Sabha 2019 :  बंडखोर म्हणतायत, 'तुमचं काय जातंय; पाच वर्षे मी तयारी केली'

डॉ. माधव सावरगावे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

'तुमचं काय जातंय. पाच वर्षे मी तयारी केली; मतदारसंघात पक्षाने काय केले? मग तुम्ही का माझ्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकता?, उमेदवारी मिळावी म्हणून मी प्रयत्न करीत होतो, त्यावेळी तुम्ही कुठे होते' असे अनेक सवाल शिवसेना-भाजपमधील बंडखोरांनी केल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची आणि पक्षांच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. 

विधानसभा 2019
औरंगाबाद : 'तुमचं काय जातंय. पाच वर्षे मी तयारी केली; मतदारसंघात पक्षाने काय केले? मग तुम्ही का माझ्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकता?, उमेदवारी मिळावी म्हणून मी प्रयत्न करीत होतो, त्यावेळी तुम्ही कुठे होते' असे अनेक सवाल शिवसेना-भाजपमधील बंडखोरांनी केल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची आणि पक्षांच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. 

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील बंडखोरांना रोखण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी बैठकांसोबत खल झाला. शिवसेनेचा बंडखोर मागे घेतला तर भाजपचा घेईल आणि भाजपचा घेतला तर शिवसेनेचा बंडखोर माघार घेईल अशी अटकळ भाजप-सेनेच्या नेत्यांकडून बांधली जात असतानाच बंडखोरांनी थेट त्यांनाच रात्री सुनावल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

एका बंडखोरांनी तर मी निवडून कसा येऊ शकतो? याचे सर्वेक्षणाच्या आधारावर समजावून सांगितले. मी निवडून आलो तर परत पक्षालाच पाठिंबा देईन, त्यामुळे तुम्ही आपल्या पक्षाचं भलं बघा; दुसऱ्याचं सोडा असा सल्लाही बंडखोरांनी दिल्याने पक्षांच्या नेत्यांची अडचण झाली. काही बंडखोर उमेदवारानी माघार घेणार नसल्याचे सांगून टाकले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या त्यांच्या विश्वासातील लोकांना सांगून विनंतीवजा मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. यामध्ये किती जणांना यश मिळते, आज सकाळी ११ नंतर कळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rebel candidate warned shivsena bjp alliance in Aurangabad