vidhansabha 2019 औरंगाबाद;काही मतदारसंघांतील बंडोबा झाले थंड

प्रकाश बनकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये नाराजी समोर आली. त्यामुळे भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात प्रमुख्याने भाजप-सेनेच्या उमदेवारांनी एकमेकांच्या मतदारसंघांत अर्ज दाखल केले होते. त्या बंडोबांना शांत करण्यासाठी रविवारी दिवसभर भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या.

औरंगाबाद : राज्यात युती आणि आघाडी झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात भाजपच्या मतदारसंघांत शिवसेनेने आणि शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी दाखल केली होती. या बंडोबांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने सोमवारी (ता. सात) पश्‍चिममधून राजू शिंदे, कन्नडमधून किशोर पवार वगळता सर्वांनी अर्ज मागे घेतले. यात मध्यमधून किशनचंद तनवाणी, पूर्वमधून रेणुकादास वैद्य, तर पश्‍चिममधून बाळासाहेब गायकवाड यांनी माघार घेतली. 

युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये नाराजी समोर आली. त्यामुळे भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात प्रमुख्याने भाजप-सेनेच्या उमदेवारांनी एकमेकांच्या मतदारसंघांत अर्ज दाखल केले होते. त्या बंडोबांना शांत करण्यासाठी रविवारी दिवसभर भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या.

समजून काढूनही दिवसभरात कुठलाच निर्णय झाला नव्हता. यामुळे पुन्हा औरंगाबाद पश्‍चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा बंडखोरांच्या भेटी घेत अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले होते. या बैठकीनंतर शिरीष बोराळकर व डॉ. कराड यांनी गुलमंडी गाठत भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची समजूत काढली. त्यानंतर तनवाणी यांनी माघार घेतली. त्यासह पश्‍चिममधून बाळासाहेब गायकवाड यांनी माघार गेली. पूर्वमधून शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत माघार घेतली. सिल्लोडमधूनही बनकर, मिरकर, फुलंब्रीतून रमेश पवार, कन्नडमधून संजय गव्हाणे, संजय राठोड यांनी माघार घेतली. 

राजू शिंदे, पवारांची बंडखोरी कायम 
बंडखोरी केलेल्यांची समजून काढण्यात यश आले असले तरी पश्‍चिममधून भाजपतर्फे राजू शिंदे यांनी, तर कन्नडमधून बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी अर्ज मागे घेतला नाही. राजू शिंदे यांनी फोन स्वीच ऑफ केला होता. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार उमेदवारी अर्ज ठेवल्याचे त्यांनी सांगितले. 
तर किशोर पवारांनी पक्ष आदेश धुडकावल्यामुळे शिंदे आणि पवारांना पक्षातून बडतर्फ करण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. 

मतदारसंघ अर्ज मागे घेतलेले उमेदवार
औरंगाबाद पूर्व  रेणुकादास वैद्य
औरंगाबाद मध्य जावेद कुरैशी,किशननंद तनवाणी
औरंगाबाद पश्‍चिम बाळासाहेब गायकवाड
फुलंब्री रमेश पवार
सिल्लोड सुरेश बनकर, सुनील मिरकर
कन्नड प्रसन्ना राठोड,संजय गव्हाणे, राजेंद्र राठोड
पैठण कांचन चाटे, कल्याण गायकवाड
गंगापूर डॉ. ज्ञानेश्‍वर नीळ ,किरण पाटील डोणगावकर
वैजापूर एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परदेशी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rebellion in some constituencies became cold