Travels Tractor Accident
sakal
बीड - खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचा बेशिस्तपणा, भरधाव वेग आणि वाहतुकीच्या नियमांची होणारी पायमल्ली प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, असा स्पष्ट इशारा 'दैनिक सकाळ'ने गुरुवारच्या (ता. १९) अंकात सविस्तर वृत्ताद्वारे दिला होता. हा इशारा ताजा असतानाच, बुधवारी (ता. १८) मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास बीडजवळील म्हसोबा फाटा येथे एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.