esakal | हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात यावर्षी विक्रमी कर्ज वाटप

बोलून बातमी शोधा

file photo}

जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामामध्ये विक्रमी कर्जवाटप झाले आहे. आत्तापर्यंत ७३.०२ टक्के कर्जवाटप झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात यावर्षी विक्रमी कर्ज वाटप
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात  खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची अशा रब्बी हंगामाकडे लागले होती. खरीपातील पिके हातची  गेल्यानी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बैंकाकडे कर्जासाठी प्रस्ताव दाखल केले होते. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कर्जवाटपाला काहींशी फटका बसला होता . त्यांनतर मात्र बँकानी कर्जवाटपात आघाडी घेतली. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामामध्ये विक्रमी कर्जवाटप झाले आहे. आत्तापर्यंत ७३.०२ टक्के कर्जवाटप झाले आहे.

सन २०२०-२१ या रब्बी हंगामासाठी हिंगोली जिल्ह्याला कर्जवाटपासाठी २७४ कोटी ७८ लाख रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३७ कोटी चार लाख रुपयाच्या उद्दिष्टापैकी या बँकेने आत्तापर्यंत ९६.२४ टक्के असे विक्रमी कर्जवाटप केले आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सात हजार ७३१ शेतकऱ्यांना ३५ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपयाचा कर्जवाटप केले आहे.

हेही वाचामाहूर, किनवटकरांची ‘बत्ती गुल’च्या त्रासापासून सुटका

व्यापारी बॅंकाना असलेल्या १९७ कोटी ७० लाख रुपयाच्या उद्दिष्टापैकी १४६ कोटी १३ लाख १५ हजार रुपयाचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ज्याचा लाभ १६ हजार १८ शेतकऱ्यांना झाला आहे. या बँकांची टक्केवारी ७३.९२ टक्के आहे. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला असलेल्या ४० कोटी चार लाख रुपयाच्या उद्दिष्टांपैकी १८ कोटी ८७ लाख चार हजार रुपयाचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ज्याचा लाभ जिल्ह्यातील तीन हजार ११६ शेतकऱ्यांना झाला आहे. या बँकांची टक्केवारी ४७.१३ टक्के अशी आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून कर्जवाटप करण्यात आले.

शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे यातील अनेक शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र ठरले. त्यामुळे या शेतकयांना रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात कर्जवाटपाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा कर्जवाटप विक्रमी पद्धतीने लाख वाढले आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर  काही महिन्यापूर्वी कर्जवाटप संथगतिने सुरू होते. त्यानंतर आत्ता मात्र कर्जवाटप ११६ नियमितपणे सुरू असल्याने जिल्ह्यात  कर्जवाटपाची टक्केवारी वाढली आहे. बँकानी शेतकऱ्यांना वेळेत कर्जवाटप करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासन व सहकार विभागाने दिल्या होत्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे